"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत"...

"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी
लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा
"श्रीमंत"...


एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत
बसली होती.
.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि
बिस्कीटपुडा खरेदी केला.
.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती
“व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक
वाचत बसली.
.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत
बसले होते.
.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी
ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन
खाल्ले.
.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!"
.
"माझ्या अंगी थोडी हिंमत
असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!"
.
ती मनात विचार करत होती.
.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच
होते.
.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल,
का?
मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
.
ती विचार करत होती.
“आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स
उघडली.
.
पाहते तर काय,
तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली,
याची तिला खूप लाज वाटली.
.
एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने
आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली
होती.
.
तिने नजर टाकली,
तर,
शेवटचे बिस्कीटही त्याने
तिच्यासाठी ठेवले होते.
.
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा
आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे;
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण
सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
.
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा
प्रत्यक्षात नसतात....!!!
.
"चांगली वस्तु"
"चांगली व्यक्ती"

"चांगले दिवस"
यांची
"किंमत"
निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी
लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा
"श्रीमंत"...

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!