माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये ||

माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये ||

माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये ||
दया ती पहावी सद्गुरूनाथांची | समर्थांचे परी शोभतसे ||
नारी-नर ज्याला झाले रामरूप | नाही नाही भेद तिळप्राय ||
कोट्यानुकोटी उद्धरिले लोक | रामनाम एक बोधूनिया ||
करुनी व्यवहार परी नाही लिप्त | पंकांतूनि गगन तैसे जाणा ||
सच्चिदानंद स्वरूपी निमग्न | रामरूप सत्य सत्य जाणा ||
तुर्यातीत अवस्था आहे निरंतर | ब्रह्मानंद खूण सांगतसे ||
||श्रीराम जय राम जय जय राम||
___/|\___

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!