नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥

नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥

अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय ।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ॥
आज्ञेविन काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भिती तयाला ॥२॥

उगाची भितोसी भय हे पळु दे ।
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे ॥
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ॥३॥

खरा होई जागा श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त ॥
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगु स्वामी देतील साथ ॥४॥

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ॥
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥

**॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!