अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान










एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी
काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया
बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे, परि हसले
बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे
आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु
भगवान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे
हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का
देवा
घे बोलावून आता कंठाशी आलेप्राण

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English