पोरांना थोडंस घासू द्या
💐💐💐💐 *पोरांना थोडंस घासू द्या* 💐💐💐💐
व्यवसायानिमित्त आज नागपुरात आहे... एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलानी... संबंध असल्यामुळे "साहाब रुको चाय मंगवाता हू म्हणाला"..
आज शॉप मध्ये गर्दी कमी होती म्हणून ...थोड्या व्यावसायिक चर्चा केल्या.....
त्या व्यापाऱ्याच्या मुलानी चहा दिला...
मी त्याला विचारले..." *आप कोणसी क्लास मे हो* "
त्यावर तो मुलगा म्हणाला .."सर मै 12th मे हू"
मी थोडं खोलात जाऊन ...त्याची दिनचर्या विचारली तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलाने आपली दिनचर्या सांगितली.........
बघा त्यातून काही बोध घेता येईल का.......
तो मुलगा आपली दिनचर्या सांगू लागला .......
"सर, मै सवेरे मॉर्निंग मे 9 बजे शॉप ओपन करता हू.. साथ मे खाणे का टिफिन भी लाता हू, फिर 11 बजे डायरेक्ट शॉप से कॉलेज जाता हू.... फिर श्याम 5.3 बजे कॉलेज छुटने के बाद मै शॉप पर आता हू.....
और 9 बजे शॉप बंद करके... घर मे हम सब जाते है.....
मैने पुछा .."पढाई कब करते हो,"
उस लडके ने कहा रात को और सुबह जलदी उठकर करता हू....."
फिर मैने पुछा..." त्योहार को जब छुटी होती है, तब आप क्या करतो हो"....
उस लडके ने कहा ..." सर मै शॉप पर रहता हू"
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
म्हणजे लक्षात घ्या ...करोडो रुपयांची संपत्ती त्या व्यापाऱ्याच्या मुलाकडे असूनही त्याला काम करून शिक्षण घ्यावे लागते....
त्याचे वडील त्याला नोकराच्या तोडीचे काम सांगत होता.....
आणि तो मुलगा ते काम आवडीने करीत होता...
*************************************************
आणि याउलट छटाकभर ची संपत्ती असणारे आमचे लोकं ,नोकरी वाले लोकं.... आपल्या पोराले अजिबात शारीरिक धक्का लागणार नाही ...पाहिजे ती गरज रेडिमेड उपलब्ध करून देत असतात........
जवाबदारी ची जाणीव होईल अश्या कामापासून कोसो दूर ठेवतात.......
फुकटात कोणतेही काम न करता ..*पॉकेट मनी* देत असतात.........
आणि मग जेव्हा पोरगं निव्वळ शरीराने मोठं होते आणि अक्कल कवडीचीही दिसत नाही... हुशारी दिसत नाही ,तेव्हा हीच आई वडील पोराला दोष देतात.....
राजाभाऊ असं नसते..... त्यालाही जवाबदारी येऊ द्या... जवाबदारी ची जाणीव होऊ द्या........
सगळं लाड पुरवा but त्याची थोडीशी जिरवतही जा.....
छोट्याश्या ,..कोवळ्या.. एक दोन वर्षांच्या वयातील बाळाला जेव्हा आई वडिलांनसमोर इंजेक्शन दिल्या जात असते.... तेव्हा बाळाला होणाऱ्या त्रासाकडे आईवडील दुर्लक्ष करीत असते ....कारण पोराचं जीव महत्वाचं असते.... ती बिमारी दूर होणं महत्वाच आहे.......
अगदी त्याच प्रकारे...... आपल्या पोरांना थोडंस त्रास होऊ द्या.... त्यालाही थोडंस घासू द्या..... येईल अक्कल हळूहळू....
*पोरगं शाळेच्या मार्कशीट वर किती मार्क घेते, यापेक्षा महत्वाचे म्हणजे.. जीवनाच्या मार्कशीट वर किती मार्क घेतो ,याला जास्त महत्व असायला पाहिजे* .......
बघा विचार करून.........
Comments
Post a Comment