Posts

संत हे चालते-बोलते देवच आहेत.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ६ एप्रिल :: संत हे चालते-बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे ? तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भिती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते द...

संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १७ एप्रिल :: संत 'तू भगवंताचा आहेस' ही जाणीव देतात. आपण कोणतेही कृत्य करीत असताना, ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी, आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार ? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतरा...

Shri Guru Charitra Importance & Benefits...

Image

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

Image
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावून आता कंठाशी आलेप्राण संकलित!

माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये ||

Image
माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये || माझे सद्गुरुराव मारुति-अवतार | कोणी हा संदेह धरू नये || दया ती पहावी सद्गुरूनाथांची | समर्थांचे परी शोभतसे || नारी-नर ज्याला झाले रामरूप | नाही नाही भेद तिळप्राय || कोट्यानुकोटी उद्धरिले लोक | रामनाम एक बोधूनिया || करुनी व्यवहार परी नाही लिप्त | पंकांतूनि गगन तैसे जाणा || सच्चिदानंद स्वरूपी निमग्न | रामरूप सत्य सत्य जाणा || तुर्यातीत अवस्था आहे निरंतर | ब्रह्मानंद खूण सांगतसे || ||श्रीराम जय राम जय जय राम|| ___/|\___

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ॥ अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥ जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ॥ आज्ञेविन काळ ना नेई त्याला । परलोकीही ना भिती तयाला ॥२॥ उगाची भितोसी भय हे पळु दे । जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे ॥ जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा । नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ॥३॥ खरा होई जागा श्रद्धेसहीत । कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त ॥ कितीदा दिला बोल त्यांनीच हात । नको डगमगु स्वामी देतील साथ ॥४॥ विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ । स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ॥ हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती । न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥ **॥ श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु ॥**

४ एप्रिल :: संत कसे असतात ? How is nature of Saint(Good person)

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ४ एप्रिल :: संत कसे असतात ? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो, तोच खरा गुरू. सदगुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामार्‍या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. 'वाईट वाटत नाही' याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात...