झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. Marigold crop insect, pest and disease control.
झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. लेख - २७. ०९. २०२०
* प्रगतशील शेतकरी ग्रुप *
===============================================================
दसरा २५ ऑक्टोबर २०२० आणि दिवाळी १४ नोव्हेंबर २०२० जवळ येत आहे आणि दसरा आणि दिवाळी ला झेंडू फुलाची मागणी भरपूर प्रमाणात होते. झेंडू उत्पादन वाढण्यासाठी कीड व रोग नियंत्रण करणे अति आवश्यक आहे.
-झेंडू पिकावरील येणार येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून त्यावर योग्य वेळी उपाय योजना केल्यावर पीक संरक्षण होऊन उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईन.
#झुडूंवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी या रस शोषक किडी व पाने खाणारी अळीचा प्रकार आढळतो.
-प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम अथवा डाय मिथोएट - १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
झेंडू वरील रोग :- मर व करपा
- मर हा रोग मुख्यतः आफ्रिकन झेंडू पिकावर आढळतो. गरमी मध्ये (उष्ण वातावरणात) अथवा हवेत पाण्याचे प्रमाण (आद्रता) जास्त असल्यास मर रोग वाढतो.
- मर रोग आल्यास झेंडूची पाणी पिवळी पडतात, झेंडूची मुळे सडतात. झेंडूचे पीक पाने पिवळी पडल्यामुळे व झुडूंचे मुळे सोडल्यामुळे मारतात म्हणून या रोगाला मर रोग म्हणतात.
- मर रोग होऊ नये म्हणून झेंडू पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतिने एकात्मिक नियोजन करावे. जसे झेंडू लागवड करतांनाच पाण्याचं निचरा होणारी जमीन निवडावी. पिकांची फेरपालट करणे अंत्यंत आवश्यक असते. प्रत्रेक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
- कार्बेनडेंझीम > झेंडू पिकात मर दिसताच कार्बेनडेंझीम १ ग्राम + १ लिटर पाण्यात मिसळून झेंडू पिका भोवती आळवणी करावी आणि फवारणी सुद्धा करावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
करपा हा सुध्दा झुडूंवर आढळणारा प्रमुख रोग आहे. मर रोगाप्रमाणेच करपा हा रोग बुरशी पासून होतो.
-करपा रोगाचे लक्षण झेंडू पिकाच्या खालच्या पानावर दिसून त्यानंतात करपा वरच्या दिशेने वाढत जातो. यामुळे पानावर काळे ठिपके दसून पाने गळतात व परिणामी झेंडू करपून मरतो म्हणून या रोगाला करपा रोग म्हणतात.
-उपाय योजना म्हणून करपलेले पाने जाळावी.
- मॅन्कोझेब पूर्णांक २ टक्के किंवा कार्बेनडेंझीम पूर्णांक १ टक्के १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारणी रोगाच्या लक्षणाप्रमाणे कराव्यात.
================================================================
धन्यवाद
Comments
Post a Comment