सोंग
#सोंग_ *तो* घरातला कर्ता पुरुष शांत विचारात मग्न बसलेला . मुळ म्हणजे मध्यम वर्गीय घरातला बायको : अहो... घरातलं तेल संपलय जरा घेऊन या! तो : हो आणतो. (कस सांगू हिला मोजकच कर ,😕 घरात खाणारी तोंड , वाढत्या वयात आलेली पोरं त्यांना खाऊ नका म्हणून सांगू तरी कस? वय झालेले आई वडील त्यांना ही लागताच की निदान औषध घेण्यापूर्वी तरी.. धंदा बंद पडलाय. हवं तेवढं सगळ्या रोजच्या कमाई चा साठा संपलाय , खिशातले शेवटचे ५०० रुपये.. उद्या पर्यंत संपणार.. मग? घेऊ का सोंग पैश्याचं? की भिकेचं?) नको ! नगर शेवकाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं तर शिवभोजनाची थाळ घेतांना तर उगाच चर्चेचा विषय ... लोक : अरे काय कमी आहे त्याला, एेवढ मोठं घरदार , तरी हा ईकडे येऊन गरिबांची थाळी खातो तो: कस सांगू यांना पोट भरायला घरादाराची वीट नाही, तर अन्न लागतं म्हणून . पण पैशाचा आव तरी कसा आणू ..? हो घरात मात्र पोरांचा वेळ जावा म्हणून सारिपाटाचा डाव मांडतो डाव जिंकला की पुन्हा घरात येऊन थांबतो . मग मुलगा म्हणतो मुलगा : बाबा अहो तुमच्या सगळ्याच सोंगट्या घरात गेल्या , तुम्ही जिंकलात . आता ...