म्हणूनच मित्रांनो देवाच्या योजनेसाठी नेहमी तयार रहा. जीवनामध्ये अपघाताने काहीच घडत नाही. सर्व पूर्वनियोजीत असते.
सर्व पूर्वनियोजीत असते.
डॉ.मार्क,एक प्रख्यात विद्वान कर्करोग डॉक्टर होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांचा खूप मोठा सत्कार समारंभ होणार होता.त्यासाठी ते विमानाने निघाले होते.या समारंभाची डॉ मार्क यांना खूप उत्सुकता होती.तांत्रिक बिघाडामुळे विमान मध्येच खाली उतरवावे लागले.8 ते 10 तासाने दुसरे विमान निघणार होते,पण डॉक्टरांना समारंभाला पोहचण्याची घाई असल्याने त्यांनी कार भाड्याने घेवून पुढे जाण्याचा सल्ला वैमानिकाने दिला.त्याप्रमाणे कार घेवून प्रवास चालू केला.पण पुढे गेल्यावर जोराचे वादळ आणि पाऊस चालू झाल्याने डॉ.रस्ता चुकले आणि ते खूप पुढे गेले होते.तोपर्यंत डॉ.दमले होते.त्यांना खूप भूकही लागली होती. जवळच्याच गावातील एका बाईकडे त्यांनी फोन मागितला पण त्या बाई म्हणाल्या की माझ्याकडे फोनच नाही.तसेच इथून संपर्काचे कुठलेच साधन नाही.कृपया आपण माझ्या घरी या ,अल्पोपहार करा
अन विश्रांती घ्या.डॉ.दमले होते व त्यांचेपुढे दुसरा मार्गच नव्हता.ते गेले.थोडा फराळ केला तोपर्यंत त्या अनोळखी बाईची प्रार्थनेची वेळ झाली होती.त्या डॉ.ना माझ्याबरोबर प्रार्थनेला या,असे म्हणाल्या.
डॉ म्हणाले,माझा देवापेक्षा माझ्या कतृत्वावर जास्त विश्वास आहे.कृपया तुम्ही प्रार्थना करा.बाईंनी प्रार्थना सूरू केली.त्यांचे छोटे बाळ पाऴण्यात झोपले होते.प्रत्येक प्रार्थनेनंतर ती आपल्या बाळाकडे कारूण्याने पाहत होती.नंतर डॉ.नी तिला विचारले,तू देवाकडे काय मागितले? ती बोलली,माझ्या बाळाला कर्करोगासारख्या असाध्य रोगाने पछाडले आहे.खूप डॉक्टर झाले,पण सगळे म्हणतात,डॉ.मार्कच याला बरे करू शकतात.पण मला त्यांची फी परवडणार नाही.म्हणून मी देवाकडे काहीतरी मार्ग काढण्याबद्दल वारंवार प्रार्थना करीत आहे.
हे सर्व ऐकल्यावर डॉ. मार्क यांचे डोळे पाणावले. ते खाली मान घालून म्हणाले देवाची लिला अगाध आहे. त्यांनी मनात सर्व घटनाक्रम आठवला. विमानाचे बंद पडणे, वादळं येणे, रस्ता चुकणे हे सर्व त्या बाईंच्या प्रार्थनेच्या शक्तीने घडले.
देवाने फक्त त्या बाईंच्या प्रार्थनेला उत्तर दिले नाही तर भौतिक जगात रमलेल्या डॉ. मार्क यांना अशा लोकांची सेवा करण्याची प्रेरणा दिली , ज्यांच्याकडे पैसा नाही पण प्रार्थनेची श्रीमंती आहे.
म्हणूनच मित्रांनो देवाच्या योजनेसाठी नेहमी तयार रहा. जीवनामध्ये अपघाताने काहीच घडत नाही. सर्व पूर्वनियोजीत असते.
Comments
Post a Comment