Before Job Shifting think about this..must read article written in marathi ... जॉब बदलण्यापूर्वी
जॉब बदलण्यापूर्वी
जॉब बदलण्यापूर्वी:- करिअर, प्रमोशन, पगार यांसारखे कितीतरी निकष तुम्हाला नवीन जॉबचा विचार करायला भाग पाडतात. येणारी प्रत्येक ऑफर या कसोटय़ांवर जोखायची आणि `हो’, `नाही’चा फैसला करायचा हे वाटते तितके सोपे नाही. इथे तुम्हाला मानसिक पातळीवर सगळ्यात जास्त भर द्यावा लागतो. भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तुमच्यासारख्या जॉब सीकर्सना काही महत्त्वाची पूर्वतयारीही करावी लागते. त्यासाठी खालील टीप्स तुम्हाला सहजच महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातील.वर्क प्लेस किंवा वातावरणातील बदल ः नवीन ऑफर स्वीकारताना वातावरणातील बदलाशी जुळवून घेणं आवश्यक असं ठरतं. कामाचं स्वरुप किंवा तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं काहींना सुरुवातीस त्रासदायक ठरतं. जुन्या जॉबशी नकळत तुलना करणं सुरू होतं. बहुतेक व्यक्तींना बदल स्वीकारताना सुरुवातीस वाटणारा त्रास कालांतराने वाटेनासा होतो. करिअर बदलतं नियोजनः नवीन ठिकाणी रुजू होताना तुम्हाला पुनश्च हरि ॐ करावा लागतो. तुमच्या क्षमता, स्किल्स सिध्द करण्यासाठी अधिक वेळ काम करावं लागतं. याला किती अवधी लागतो, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या पुढच्या करिअरच्या टप्प्यांना अनिश्चितता येऊ शकते.
ऑफिसमधील सहकारीः तुम्हाला ज्या ऑफिसमध्ये काम करायचंय तिथलं वातावरण, बॉस आणि सिनिअर्सचा ऍटिटय़ूड यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही सिनिअर किंवा ज्युनिअर पोस्टवर असलात तरी तुम्हाला ऑफिसमधील सहकार्यांशी जुळवून घ्यावं लागेल. शिवाय प्रत्येक वेळी ऑफिसमधील वातावरण खेळीमेळीचं असेलच हे ठोसपणे सांगता येत नाही. तुम्ही बॉस असलात तर तुम्हाला सुरुवातीला कदाचित प्रचंड विरोधही होऊ शकतो. तुम्हाला ज्युनिअर्सकडून काम करून घेण्यापासून टॉप मॅनेजमेंटला सांभाळण्यापर्यंतची सगळी दिव्यं पार पाडावी लागतील. नेतृत्वाचं कसब तुम्हाला वेळोवेळी दाखवावं लागेल.
तुम्हाला टीमकडून जेवढय़ा कामाची अपेक्षा असेल, त्यापेक्षा दुप्पट काम तुम्हाला स्वतःलाही करावे लागेल. मॅनेजमेंटः करिअर प्रॉस्पेक्टसाठी किंवा जॉब एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला जॉब बदलणं हे आवश्यक ठरतं. मात्र केवळ अधिक पगारासाठी जॉब बदलणं हे कारण नव्या मॅनेजमेंटला तुमच्याकडे साशंक नजरेने बघण्यास पुरेसे आहे. पगारासाठी ही व्यक्ती केव्हाही दुसरीकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीतील मोठय़ा प्रोजेक्टपासून तुम्हाला दूर ठेवण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रसंगी मॅनेजमेंटचा विश्वास संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं व काहीसं आव्हानात्मक असतं. यामुळेच शक्यतो पगारातील थोडय़ाशा फरकासाठी जॉब बदलून तुमची इण्डस्ट्रीमधील प्रतिमा बिघडू देऊ नका.
आजच्या एकविसाव्या शतकात मात्र ग्लोबलायझेशनमुळे काम करण्याची तर्हा बदलली आहे. त्यामुळेच करिअरच्या दृष्टीने तुम्हाला जॉब बदलणे आवश्यक असल्यास कौन्सिलर्सने दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्सः
जॉब बदलण्यापूर्वी अगोदरच म्हणजेच पहिल्या जॉबपासून वेगवेगळ्या सुरक्षित योजनेत पैसे गुंतवा. नेहमीच्या पगाराबरोबर तुम्हाला हे उत्पन्नही मिळतं. त्यामुळे जॉब बदलताना तो थोडय़ा कालावधीत सोडावा लागला तरी फारसं टेन्शन येणार नाही.
जॉब बदलण्यापूर्वी मार्केटमधील कंपनीचं स्थान, पगार, पीएफ, प्रोस्पेक्ट, पोझिशन काय असेल याची माहिती मिळवा. करिअरच्या दृष्टीकोनातून त्याचं महत्त्व, फायदा किती आहे या दिशेने विचार करा.
तुमच्या निर्णयाचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर होणार नाही याची काळजी घ्या. सिनिअर्स मित्र, कौन्सिलर्स किंवा त्या क्षेत्रातील एक्स्पर्टचा सल्ला घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. भवितव्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती काळजी कशी घ्यावी याचाही अगोदर अंदाज बांधा.
जॉबपूर्वी संबंधित विषय किंवा क्षेत्राचं ट्रेनिंग मस्ट असल्यास ते आवश्य घ्या.
यादरम्यान फॅमिलीच्या पाठबळाची आवश्यकता असते. त्यामुळे निर्णय घेताना त्यांना विश्वासात घ्यायला विसरू नका.
सकारात्मक मानसिक तयारीसाठी जॉब स्वीकारल्यानंतर होणार्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करा.
ऑफिसमधील वातावरण, स्टाफचा असहकार यांसारखी कारणं जॉब बदलण्यामागे असू नयेत. कारण नव्या जॉबमध्येही यासारख्या समस्या असण्याची शक्यता आहे.
नवा जॉब स्वीकारताना तिथे कमीत कमी सहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण करण्याची तयारी ठेवा.
कॉण्टॅक्टमध्ये काम करत असाल तर काही कायदेशीर बाबींची पूर्तता तुम्हाला करावी लागेल हे लक्षात असू द्या.
ऑफिसचं वातावरण आणि जॉबचं स्वरुप यांच्याशी जुळवून घेताना आधीच्या जॉबशी तुलना करणं टाळा.
नव्या जॉबची ऑफर स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर स्ट्रेसशी सामना करावा लागणार आहे हे मनात पक्के लक्षात ठेवा. या काळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपा. या बाबतीत तुम्हाला मेडिटेशन आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा फायदा निश्चितच होईल.
केवळ झटपट यश, पैसा आणि प्रमोशन यांच्यामागे लागून सध्याचा जॉब बदलू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला एका ठराविक कालावधीची गरज असते. त्यामुळे अवास्तव अपेक्षा बाळगू नका. त्यातून फस्ट्रेशन निर्माण होऊन जॉब सोडण्याचा निर्णय घेत असाल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या अस्थिर स्वभावातूनच उगीचच जोखीम वाढवू नका.
एकदा ठरवल्यावर ठामपणे ध्येय मांडा. तुमचा करिअर चार्ट तयार करा. तुम्हाला नवीन जॉबमध्ये शिरण्यासाठी काय करावं लागणार आहे याचा गांभीर्याने विचार करा.
केवळ पगाराकडे पाहून तुम्हाला जॉब बदलून चालणार नाही तर तुमच्या ऑफिसमधील वातावरणही हलकं-फुलकं आणि कामाचा हुरूप वाढवणारं आहे का? याची नीट खात्री करून घ्या.
हल्ली तुम्हाला कोणतं काम येतं यापेक्षा तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे याला अधिक महत्त्व असतं. कधी कधी तुम्ही कामात कौशल्य मिळवलंय की तुम्हाला त्या कामाचा कंटाळा यायला लागतो. अशा वेळी क्षेत्र किंवा जॉब बदलावा का असे विचार मनात येतात. नवीन जॉब स्वीकारताना काही गोष्टींचा सकारात्मक आणि नकारात्मक विचार करणं जरुरी आहे. उदा. भविष्याची सुरक्षितता, नावीन्य, स्वतःत कितपत बदल करावे लागतील?
तुमचा जॉब बदलण्याचा निश्चय जरा पक्का झालेला असेल तर गो अहेड अँड डू इट. नवीन जॉब स्वीकारताना सुरुवातीला संघर्ष, तडजोड करावी लागेल, पण आपल्याला जे करायचं आहे तेच आपण करतोय. यातून जे आंतरिक समाधान आणि आनंद मिळेल त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही

Comments
Post a Comment