मला उमगलेल्या काही गोष्टी .... तुम्हाला पण अनुभव आलाच असेल

*कोरोना काळात मला उमगलेल्या काही गोष्टी .... तुम्हाला पण अनुभव आलाच  असेल ! ! !*

• लोकांचा गर्व कमी झाला 
• पैसा पेक्षा माणसाची किमत वाढली, धन दौलती पेक्षा जीवाची किमत मोठी आहे हे कळले
• घरात जेवण बनवून सुद्धा घरातले मेंबर बाहेरच सकाळ संध्याकाळ ऑनलाईन मागवून खायचे ते बंद झालं. अन्नाची नासाडी बंद झाली. मुलांना वेळ देता यायला लागला.
• स्त्रियांना घरात (गृहिणींना) किती काम असते हे पुरुषांना कळायला लागले.
• घरी कधीतरी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया रोज स्वयंपाक करू लागल्या ने मुलांना घरच्या जेवणाची चव आणि किंमत कळू लागली असावी.
• ग्रहणीची व्यथा नोकरदार महिलाना कळली असावी
• निसर्गाला सर्व समानच आहेत हे समजले (गरिब,श्रीमंत )असा भेदभाव नाही
• सर्वाना शेतकर्याची किंमत समजली असेल कारण आज सर्व सेवा बंद जिवनावश्यक भाजीपाला,दूधवगैैरे गोष्टीमाञ मिळत आहेत
• जे नेहमी म्हणायचे मला दारू पिल्या शिवाय हात पाय चालत नाहीत ते पण ठीक ठाक आहेत. न पिता
• भांडण कमी झाले.आपघात 0 झाले
• नोकरी लागली नाही याचे दुख कमी झाले
• आईला मदतीची किती गरज आहे हे कळलं.
• कमीत कमी सामुग्री मध्ये हॉटेल पेक्षा उत्तम आणि इनोव्हेटिव्ह डिश आई  करते हे समजलं.
• तू नुसती घरातच तर असते. हे वाक्य बोलताना जरासा विचार करून बोलले जाईल.
• कमीत कमी वस्तू वापरुन जीवन जास्त छान जगता येते.
• प्रत्येक गोष्टीला ब्रँड पाहिजेच. ही मानसिकता कमी होत आहे. आहे त्यात सुध्दा भागवू शकतो.
• माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,हा गैरसमज आहे व तो निसर्गाने उत्तम रित्या समजावून सांगितले आहे.
• आपण आयुष्यभर अनेक गोष्टी गरज नसतानाही जमवतो त्याची काहीही गरज नसते हे समजले.
• शेतकरी राजाचे महत्व सगळ्या जगाला कळले. जगाचा पोशिंदा बळीराजाच आहे हे सिद्ध झालं.
• जगायला सुरक्षित ठीकाण, खायला अन्न आणि मायेची माणसं लागतात. पैसे शिजवून खाता येत नाहीत हे कळालं.

संकलित!!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!