पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण Every one is guest

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा..
थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया..
इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा..
मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद..
जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला..
बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दीड दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे..
*किंमत तुमची असेलही तुमच्या प्रियजनांना लाख आठवणी ठेवतील जवळ अन् विसर्जित करतील तुमची राख..*
पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............
💐💐💐👌👌👌💐💐💐

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English