झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. Marigold crop insect, pest and disease control.
झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. लेख - २७. ०९. २०२० * प्रगतशील शेतकरी ग्रुप * =============================================================== दसरा २५ ऑक्टोबर २०२० आणि दिवाळी १४ नोव्हेंबर २०२० जवळ येत आहे आणि दसरा आणि दिवाळी ला झेंडू फुलाची मागणी भरपूर प्रमाणात होते. झेंडू उत्पादन वाढण्यासाठी कीड व रोग नियंत्रण करणे अति आवश्यक आहे. -झेंडू पिकावरील येणार येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून त्यावर योग्य वेळी उपाय योजना केल्यावर पीक संरक्षण होऊन उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईन. #झुडूंवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी या रस शोषक किडी व पाने खाणारी अळीचा प्रकार आढळतो. -प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम अथवा डाय मिथोएट - १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. - लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ----------------------------------------...