मला उमगलेल्या काही गोष्टी .... तुम्हाला पण अनुभव आलाच असेल
*कोरोना काळात मला उमगलेल्या काही गोष्टी .... तुम्हाला पण अनुभव आलाच असेल ! ! !* • लोकांचा गर्व कमी झाला • पैसा पेक्षा माणसाची किमत वाढली, धन दौलती पेक्षा जीवाची किमत मोठी आहे हे कळले • घरात जेवण बनवून सुद्धा घरातले मेंबर बाहेरच सकाळ संध्याकाळ ऑनलाईन मागवून खायचे ते बंद झालं. अन्नाची नासाडी बंद झाली. मुलांना वेळ देता यायला लागला. • स्त्रियांना घरात (गृहिणींना) किती काम असते हे पुरुषांना कळायला लागले. • घरी कधीतरी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया रोज स्वयंपाक करू लागल्या ने मुलांना घरच्या जेवणाची चव आणि किंमत कळू लागली असावी. • ग्रहणीची व्यथा नोकरदार महिलाना कळली असावी • निसर्गाला सर्व समानच आहेत हे समजले (गरिब,श्रीमंत )असा भेदभाव नाही • सर्वाना शेतकर्याची किंमत समजली असेल कारण आज सर्व सेवा बंद जिवनावश्यक भाजीपाला,दूधवगैैरे गोष्टीमाञ मिळत आहेत • जे नेहमी म्हणायचे मला दारू पिल्या शिवाय हात पाय चालत नाहीत ते पण ठीक ठाक आहेत. न पिता • भांडण कमी झाले.आपघात 0 झाले • नोकरी लागली नाही याचे दुख कमी झाले • आईला मदतीची किती गरज आहे हे कळलं. • कमीत कमी सामुग्री मध्ये हॉटेल पेक्षा उत्तम आणि इनोव्हेटिव्ह