Posts

Showing posts from March, 2014

Before Job Shifting think about this..must read article written in marathi ... जॉब बदलण्यापूर्वी

जॉब बदलण्यापूर्वी जॉब बदलण्यापूर्वी:- करिअर, प्रमोशन, पगार यांसारखे कितीतरी निकष तुम्हाला नवीन जॉबचा विचार करायला भाग पाडतात. येणारी प्रत्येक ऑफर या कसोटय़ांवर जोखायची आणि `हो’, `नाही’चा फैसला करायचा हे वाटते तितके सोपे नाही. इथे तुम्हाला मानसिक पातळीवर सगळ्यात जास्त भर द्यावा लागतो. भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तुमच्यासारख्या जॉब सीकर्सना काही महत्त्वाची पूर्वतयारीही करावी लागते. त्यासाठी खालील टीप्स तुम्हाला सहजच महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातील.वर्क प्लेस किंवा वातावरणातील बदल ः नवीन ऑफर स्वीकारताना वातावरणातील बदलाशी जुळवून घेणं आवश्यक असं ठरतं. कामाचं स्वरुप किंवा तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं काहींना सुरुवातीस त्रासदायक ठरतं. जुन्या जॉबशी नकळत तुलना करणं सुरू होतं. बहुतेक व्यक्तींना बदल स्वीकारताना सुरुवातीस वाटणारा त्रास कालांतराने वाटेनासा होतो. करिअर बदलतं नियोजनः नवीन ठिकाणी रुजू होताना तुम्हाला पुनश्च हरि ॐ करावा लागतो. तुमच्या क्षमता, स्किल्स सिध्द करण्यासाठी अधिक वेळ काम करावं लागतं. याला किती अवधी लागतो, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या पुढच्या करिअरच्या